*ते नव्हं,*
*आपला जागं व्हायचा मुहूर्त तरी कवा हाय म्हणायचा?*
*'वणी'ला ढगफुटी...*
*पुण्यात 13 जण जीवानिशी गेलं...*
*आणि आकडा तासातासाला वाढतोच हाय...*
*ऑगष्टमदी देशात 33 शहरात ढगफुटी...*
*कोल्हापूरकरांनी महापूर तर आधीच बघितलाय...*
*तिकडं काही भागात 35 दिवसात एकदा पाणी मिळतंय...*
*दूर पलीकडे बहामात पाणी आणि अन्नासाठी आत्ताच खून पडलेत...*
*तुम्ही झोपडीत रहात असा नाहीतर करोडोंच्या बंगल्यात... कोणच वाचणार नाय... समदी एकजात मरणार... कारण जिवाणूंचं कामच बिघडत चाललंय... ग्लोबल वॉर्मिंगमुळं ! खाल्यालं अन्न पचवायला पोटातल्या जिवाणूंचं आणि पिकांनी अन्न बनवायला जमिनीतल्या जिवाणूंचं काम खूप महत्त्वाचे हाये. तेच बिघडल्यावर मानवजात वाचणं अगदी अशक्य !*
*शास्त्रज्ञच ह्ये सांगतायत...*
*संकटांची मालिका सुरू झालीया सगळीकडं... महापूर, ढगफुटी, ऍसिड रेन, दीर्घ दुष्काळ, वादळे, चक्रीवादळे, गारपीटी, वणवे, उष्मा लाटा, साथीचे रोग,...*
*एकामागोमाग एक...*
*पण आम्ही अडकलेले EMI च्या चक्करमध्ये नाहीतर 'एक और...' च्या नशेमध्ये...*
*मशीन झालंय आमचं...रोबोट जणू !*
*ते 'संवेदना' की काय म्हणत्यात... कधीतरी जागं हुतय... आणि परत गोठून जातंय... वर्षाला लाखभर प्रजाती नष्ट हुत्यात म्हणं... पण आत काय हालत नाय... काय बी आतवर पोहचत नाय... बधिर झालंय जणू !* *मशीन...रोबोट... धावतय नुसतं... दिवसरात्र... कशासाठी, कुठंवर, किती वेगानं,... शिकीवलंयच त्येला 25 वर्स... फक्त सगळ्यांच्या फ़ुडं धावायचं... जरा वाईज शांती न्हाय, समाधान न्हाय,... कुणासाठी वेळ न्हाय...*
*म्हणून इचारतुया... नक्की कधी मुहूर्त हाय म्हणायचा, समदी मानवजात जागी व्हायचा... म्हंजे लई ई ई ई मोठा तडाखा बसल्याशिवाय जाग व्हायचंच नाय, असं ठरवलंय काय ?*
*ध्यानात असू द्या, फकस्त 5 वर्षे बाकी हाईत हातात... गपगुमान सुधारला तर बरं...*
*नाहीतर आपला बी डायनोसॉर हुनार हाय पुढल्या 15 वर्षांत... असं मी नव्हं, शास्त्रज्ञ म्हणत्यात... त्याचं इशारं नाही मानलं की काय हुतय बघितलंय मागल्याच महिन्यात...*
*आणि हे परत परत हुवाय नगं असंल, तर,*
*यायलाच लागतंय... रॅली हाय !*
*दसरा चौक, कोल्हापूर*
*शनिवार, 28 सप्टेंबर*
*बरोबर साडे तीन ते 6*
*आणि ह्येचा कुठल्याबी राजकीय पक्षाशी काडीचा संबंध नाय... ही मोहीम दुसऱ्या देशातल्या 15 वर्षाच्या मुलींनं सुरू केलिया मागल्या वर्षी... आता 170 देशातली 50 लाख पेक्षा अधिक जनता सामील झालीया ह्या जनजागरण रॅलीत,...झाडून सारं शास्त्रज्ञ बी !*
*आणि तुमास्नी मात्र रॅलीसाठी 2 तास बी वेळ नसंल,*
*तर घरात, शेजारी खेळणाऱ्या-बागडणाऱ्या चिल्यापिल्यांकडं बघायचं...आणि त्यासनी पुढं जीवन असाया पाहिजे वाटत असल, तर काम धाम सोडून तडक यायचं दसरा चौकात...शपथ हाय तुला समद्या लेकरांची !!!*
*वाट बघतूया...*
*नाहीतर?...*
*म्युझियम मधला डायनासोर !*
*लक्षात ठिवायचं !*
*निसर्गाला माणसाची काय बी गरज नाय!*
*व्हिडीओ लिंक*
https://youtu.be/tf0e9sbJVS8
- स्वागतोत्सुक,
*फ्रायडेज् फॉर फ्युचर- कोल्हापूर*
महेश 9922403166
फेसबुक : *fff kolhapur*
लेखन: नितीन डोईफोडे (9561933771)
*याबाबत अधिक माहिती :*
🔴 *Red Alert* 🔴  https://nitindoiphode73.blogspot.com/2019/09/red-alertred-alertred-alert-13.html?m=
*Everyone is invited*
*Everyone is needed*
*प्रत्येकजण महत्त्वाचा हाये*
*येताना दहा जणाला घेऊन यायला लागतंय*

Comments