*भारताने 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' का जाहीर करायला हवी?* (वाचनकाल: 3.30 मिनिटे) *1)शतकातून एखादवेळी होणारी ढगफुटी ह्या मान्सूनमध्ये भारतात शेकडो ठिकाणी झाली. लाखो लोक पूरग्रस्त व अब्जावधी रुपयांचे नुकसान! पुरामुळे सुपीक शेतातील मातीचा वरचा अनमोल थर वाहून जात आहे.* *2) महाराष्ट्रात ह्या मौसमात सव्वा दोन कोटी एकरवरील पिके नष्ट झाली. देशभरातील आकडेवारी खूप मोठी निघेल. सरकारकडून जाहीर झालेली मदत एकरी 3 ते 6 हजार! ज्या एकरातील पिकामुळे घरी लाख, दोन लाख येणार होते व त्यामुळे वर्षभर घर चालणार होते त्यांच्या आयुष्याची होणारी फरफट डोळ्यांपुढे आणून बघा. देशभरात हेच चित्र आहे.* *3) 2018 साली भारतात 485 ठिकाणी उष्मा लाटा आल्या, 2010 साली फक्त 21 ठिकाणी उष्मालाटा आल्या होत्या. त्या दरवर्षी वाढत आहेत. दोन शहरात तापमान 50℃ च्या पार गेले. उष्मालाटांमुळे दरवर्षी शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत.* *4) भारतात आजमितीला जल-जमीन-वायुप्रदूषण चरमसीमेला पोहचले आहे. सरकारी रिपोर्टनुसार देशाची 30% सुपीक जमीन वाळवंटीकरणाकडे झुकली आहे. देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येणार आहे. कारण सागरी प्रजाती ...
Posts
Showing posts from December, 2019
- Get link
- X
- Other Apps
...नाहीतर आपला पण डायनासोर होईल कल्पना करा, चीन सारख्या मोठ्या देशाने भारतावर आक्रमण केले आहे, काय घडेल? आणीबाणी जाहीर होईल आणि धर्म, जात, पंथ, पक्षीय राजकारण, उच-नीच, श्रीमंत-गरीब, सर्व भेद विसरून 135 करोड भारत वासी एक होतील आणि पूर्ण देश सर्व ताकद एकवटून युद्धास सज्ज होईल, कारण आपल्याला कोणाचे गुलाम व्हायचे नाही. मित्रहो, अशा युध्दापेक्षा शेकडो पट मोठे संकट आज मानवजातीवर घिरट्या घालत आहे. भारतासहित सर्व राष्ट्रांनी 'पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर करून युद्धपातळीवर उपाय करायला हवेत, कारण सर्वशक्तिमान डायनोसॉर जसे पृथ्वीवरून अचानक नष्ट झाले, तसे मानवदेखील नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक तापमानवाढ व हवामानबदल हे हाताबाहेर जाण्याच्या बेतात आहे. 5 नोव्हेंबर 2019 रोजी 153 देशांच्या 11258 शास्त्रज्ञांनी क्लायमेट इमर्जन्सी अर्थात आणीबाणी जाहीर केली आहे. मागील वर्षी 20 हजार शास्त्रज्ञांनी असाच इशारा देऊनदेखील जगभरातील सर्व सरकारे-उद्योगपती यांनी नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले. गेली 30 वर्षे ते हेच करत आले आहेत. खरी शास्त्रीय आकडेवारी जाहीर केली जात नसल्यामुळे व स्थिती...
- Get link
- X
- Other Apps
*कोल्हापूरचा महापूर, आई अंबा बाई, जोतिबा आणि 33 कोटी देव* *आधी उन्हाने भाजून काढलं. आता पावसाने रडवलं. अर्धा भारत पाण्याविना तडफडतोय; अर्धा पाण्यामुळे!* कोल्हापुरात सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा महापूर आला आहे. अशा वेळी *आई अंबा बाई तूच वाचव,आता धाव...* अशी आर्त विनवणी करणारे मेसेज व्हाट्सएपवर फिरत आहेत. *महापुरात आपले प्राण धोक्यात घालून शेकडो लोकांनी, अडकलेल्या हजारो लोकांचे प्राण वाचवले. तो जोतिबाच ह्या सोडविणाऱ्यांच्या रुपाने आला होता. त्यांचे ऋण न फेडता येणारे!* *आई अंबा बाई, आई भवानी, रेणुकामाता रागावली आहे... सर्व सजीवसृष्टी निर्माण करणारी ती असीम-अनंत शक्ती...आज नाराज आहे माणसावर...हे समजून घ्या. तिने निर्माण केलेल्या कोट्यावधी जीवांपैकी एक जीव म्हणजे माणूस. आणि ह्या माणसाने आज ह्यापैकी लाखो जीवांचा नाश केलाय...मागच्या 200 वर्षात लाखो प्रजाती नष्ट केल्यात...आणि विकासाच्या नावाचे हे विनाशचक्र सध्या वर्षाला सुमारे एक लाख प्रजाती नष्ट करतेय. कोणती आई आपल्या लेकरांची हत्या सहन करेल? लक्षात ठेवा- अंबा बाई माफ तेंव्हाच करेल ज्यावेळी हा पृथ्वी भकास करणारा विकास माणूस थांबवेल. ह...