*हाताने रंगवलेल्या एका पोस्टरची क्रांती ; मानवजात वाचवण्याची एकमेव आशा*
(पोस्ट वाचण्यास लागणारा वेळ: फक्त 3.5 मिनिटे)
*प्रश्न 1)*
*Why should I join Fridays For Future?*
*मी 'फ्रायडेज् फॉर फ्यूचर'-मोहीमेत का सामील व्हावे?*
उत्तर- कोल्हापूरला बसलेला महापुराचा तडाखा ही एक छोटी झलक आहे. *ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार "आपण दररोज 4 लाख अणुबॉम्बच्या स्फोटातून बाहेर पडेल इतकी उष्णता पृथ्वीच्या वातावरणात सोडत आहोत...दररोज !" यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. आपण 2013 पासून रेड झोन मध्ये प्रवेश केला आहे. निसर्गाचे संतुलन, कोसळण्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. येत्या 5 वर्षांत मोठे बदल नाही केले तर निसर्गात विनाशकारी घटनांची अशी मालिका सुरू होईल की मग सावरायलाही वेळ नसेल आणि तेव्हा उपाय करूनदेखील फायदा होणार नाही. पुढील 20 वर्षांत मानवजात नष्ट होऊ शकते, हा शास्त्रज्ञांचा इशारा आहे. याबद्दल जगभरातील सर्व सरकारे पुरेशा उपाययोजना करत नसल्याने जगभर शास्त्रज्ञ रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. सर्व शास्त्रज्ञ आपल्या सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.*
आज आपण खूप व्यस्त आहात. *आपली दिवसरात्र चालू असलेली जगण्याची धावपळ शून्य, निरर्थक होणार आहे; जर वेळीच उपाय नाही केले तर !*
*...म्हणून आपल्याच सुरक्षित भविष्यासाठी आपण आठवड्यात एक तासदेखील काढू शकत नाही का?* 
*प्रश्न 2)*
*आम्ही दर शुक्रवारी हाती पोस्टर धरून जागृती केल्याने काय फरक पडणार आहे?*
उत्तर- *परिस्थिती टोकाची गंभीर आहे आणि मी एकटा काय करू शकतो असे वाटणे स्वाभाविक आहे. पण आपण एकत्र आलो तर आवश्यक बदल नक्की घडू शकतो. फक्त 3.5% लोकांनी रस्त्यावर उतरून मागणी केली तर कोणतीही मोहीम 100% यशस्वी होते असा जगभरातील अनुभव आहे. जिथे ह्या 3.5% च्या मंत्रामुळे, हुकूमशाही किंवा राजेशाही जाऊन लोकशाही आली, तिथे पर्यावरणासाठी धोरणे बदलणे हा विषय किरकोळ आहे.*
*ग्रेटा थनबर्ग नावाच्या एका 15 वर्षाच्या मुलीने एक पोस्टर हाती घेऊन या मोहिमेची सुरुवात 20 ऑगस्ट 2018 रोजी केली. "पर्यावरणबदल निषेधार्थ शाळा बंद" असे ते पोस्टर होते. पहिले 3 आठवडे कोणीच तिच्याकडे लक्ष दिले नाही. पण तिचा निर्धार ठाम होता.* *जगातील सर्व शास्त्रज्ञ व पर्यावरणविषयक NGO आज तिच्यामागे आहेत.  केवळ 13 महिन्यात 174 देशांतील 72 लाख लोक  रस्त्यावर उतरून ह्या जनजागृती मोहिमेत सामील झाले आहेत.*
सर्वांचे एकच मागणे आहे- *"सायन्सचे ऐका: तातडीच्या उपाययोजना राबवा".* परिणामी *23 देश, 775 महानगरपालिका व 7000 युनिव्हर्सिटी-कॉलेजनी पर्यावरणीय आणीबाणी* जाहीर केली आहे. आज ज्या देशातील 3.5% पेक्षा अधिक लोक या मोहिमेत सामील झाले आहेत तेथील धोरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. लक्षात ठेवा, एका पोस्टरने ही क्रांती सुरू झाली आहे. प्रत्येक ठिकाणी सर्व लोक आपल्या मागण्या पोस्टरवर रंगवून शांततामय रीतीने जागृती करत आहेत.
*प्रश्न 3)*
उत्तर- *हाती पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरून जनजागरण करण्याशिवाय अन्य उपाय नाही का?*
शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी संघटना, NGO या सर्वांनी गेली 40 वर्षे सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून झाले आहेत आणि सरतेशेवटी हे सर्व ह्या लहान मुलीच्या मोहिमेत सामील झाले आहेत. निसर्गाचे तडाखे सर्वत्र वाढले असल्याने ही मोहीम वणव्यासारखी पसरत आहे. निरागस मुलांच्या *"आमचे भविष्य वाचवा"* ह्या मागणीला जोरदार प्रतिसाद मिळतोय.  *त्यामुळे आपल्या मनातील समस्या/उपाय ड्रॉइंग शीटवर लिहून, हाती पोस्टर घेऊन सामील होण्याशिवाय अन्य मार्ग नाही. गेली 40 वर्षे, सर्व आंदोलने मोडून काढणारी,शास्त्रज्ञांकडे दुर्लक्ष करणारी, पोलादी सिस्टीम आता लहान मुलांपुढे वितळू लागली आहे.*
*प्रश्न 4)*
*हे जनजागरण सरकारविरोधात आहे काय?*
उत्तर- अजिबात नाही !
*हे कोणत्याही सरकारविरोधात नाही. ही जनजागृती मानवजात वाचवण्यासाठी आहे. शतकातून एखादवेळी होणारी ढगफुटी आपण ह्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी अनेक वेळा होताना पहिली. याहून मोठी संकटे येऊ घातली आहेत. अर्धा महाराष्ट्र वाळवंटीकरणाकडे झुकला आहे, हा भारत सरकारचा रिपोर्ट आहे. 60 कोटी जनता भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहे हा नीती आयोग- भारत सरकारचा रिपोर्ट आहे. समुद्रकिनाऱ्याची सर्व शहरे लवकरच बुडणार आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी मोठे कठोर उपाय योजावे लागणार आहेत. असे निर्णय वरकरणी अप्रिय असू शकतात. जनमताचा आग्रह आणि पाठिंबा असेल तरच कोणतेही सरकार अशी कठोर उपाययोजना अंमलात आणू शकते. जर्मनीच्या चॅन्सेलर (पंतप्रधान) अँजेला मर्केल यांनी हे कबूल केले की फ्रायडे फॉर फ्यूचर ह्या मुलांच्या आंदोलनामुळे त्यांना पर्यावरणपूरक धोरणे वेगाने अंमलात आणण्यास बळ मिळाले.*
*प्रश्न 5)*
*मी आधीपासूनच दुसऱ्या पर्यावरणविषयक ग्रुपमध्ये/संघटनेत काम करतोय, मग...?*
उत्तर- *व्वा! खूपच छान, आपण आधीपासूनच अनमोल काम करताय ! फक्त सर्व पर्यावरणप्रेमी ग्रुप/संघटना/NGO यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. एकमुठ्ठी बनण्याची गरज आहे. जगभरातील सर्व संघटना एकवटल्यानेच पॉझिटिव्ह बदल सुरू झाला आहे. शहरातील 50 संघटना/ग्रुप, शहरात 50 ठिकाणी जागृती करू देत, चांगलीच गोष्ट आहे. आपल्या पोस्टरवर आपल्या संघटनेचे नाव व FFF(फ्रायडेज् फॉर फ्यूचर) असे दोन्ही आपण टाकू शकता. (ते ही इच्छा असेल तर!) मतभेद बाजूला ठेवून कॉमन मिनिमम प्रोग्रॅम घेऊन सर्वांनी एकत्र येणे जास्त महत्त्वाचे! सामील होणारी प्रत्येक व्यक्ती, ग्रुप, संघटना इथे लीडरच आहे.*
*प्रश्न 6)*
उत्तर- *FFF चे स्थानिक नेतृत्व कोण आहे?*
याला कोणीही स्थानिक नेतृत्व नाही. एकमेव जागतिक नेतृत्व 16 वर्षांची ग्रेटा थनबर्ग! (आणि आपल्या शहरातील सर्व लहान मुले!!)
*प्रश्न 7*
*मी झाडे लावणे, प्लास्टिक न वापरणे अशा गोष्टी करत आहेच, मग FFF मोहिमेत सामील व्हायची काय गरज आहे?*
उत्तर- आज अनेकजण छोटे मोठे उपाय करत आहेतच. *पण जीवघेण्या संकटातून वाचण्यासाठी मोठ्या सिस्टीम बदलाची गरज आहे. 3.5% लोक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले तरच असा बदल घडतो. याला इतर कोणताही पर्याय नाही. आज जगभर लहान मुले दर शुक्रवारी शाळा-कॉलेज बंद करून ही जागृती करत आहेत. कारण 5 वर्षांत मोठे बदल नाही झाले तर 20 वर्षांत मानवजात नष्ट होण्याइतकी स्थिती गंभीर आहे. गेल्या 250 वर्षांत निसर्गाला ओरबाडण्याचा हा परिणाम आहे. म्हणूनच 5 नोव्हेंबर 2019 ला 153 देशांच्या 11258 शास्त्रज्ञांनी "पर्यावरणीय आणीबाणी" जाहीर केली आहे.*
*आज पर्यावरण बचाव अशी ही मोहीम राहिली नाही, तर मानवजात बचाव अशी ही मोहीम आहे.*
*ठिकाण आणि वेळ* आपल्या सोयीने आपण निवडू शकता. शक्यतो शुक्रवार निवडावा. सकाळी मॉर्निग वॉक ला लोक येतात अशा वेळी त्या ठिकाणी किंवा दिवसभरात आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी आपण हे करू शकता. पोस्टर हातात धरून घरात/दारात/सोसायटीमध्ये/गल्लीत वा नजीकच्या चौकात थोडा वेळ उभे राहा. भेटणाऱ्यांना माहिती द्या. याचे फोटो काढून सोशल मीडियावर जागृतीसाठी शेअर करा. त्यामुळे *आपला सहभाग सोशल मीडियाद्वारे हजारो लोकांना प्रेरणा देईल.* (आम्हाला संपर्क करू शकता)
किंवा आपण फक्त आमच्या सोबत या आणि मोहिमेत सामील व्हा.
*स्वतःच्या व पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी दर आठवड्याला एक तास वेळ काढाच.*
लेखन: नितीन डोईफोडे (9561933771)
Like n share facebook page: *FFF Kolhapur* https://www.facebook.com/FFF-Kolhapur-101331081241282/
*(आपापल्या शहरातील मोहिमेत सामील व्हा)*
अधिक माहितीसाठी वाचा: *"रेड अलर्ट", "Now or Never"* व इतर लेख https://nitindoiphode73.blogspot.com/?m=1
*संपर्क:*
महेश शेटे 9922403166
सागर बकरे 7741091224
सुनील भाटवडेकर 9619991898
नितीन डोईफोडे 9561933771
*फ्रायडेज् फॉर फ्यूचर-कोल्हापूर*

Comments

Popular posts from this blog