*कोल्हापूरचा महापूर, आई अंबाबाई, जोतिबा आणि 33 कोटी देव*
*आधी उन्हाने भाजून काढलं. आता पावसाने रडवलं. अर्धा भारत पाण्याविना तडफडतोय; अर्धा पाण्यामुळे!*
कोल्हापुरात सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा महापूर आला आहे. अशा वेळी *आई अंबाबाई तूच वाचव,आता धाव...* अशी आर्त विनवणी करणारे मेसेज व्हाट्सएपवर फिरत आहेत.
*महापुरात आपले प्राण धोक्यात घालून शेकडो लोकांनी, अडकलेल्या हजारो लोकांचे प्राण वाचवले. तो जोतिबाच ह्या सोडविणाऱ्यांच्या रुपाने आला होता. त्यांचे ऋण न फेडता येणारे!*
*आई अंबाबाई, आई भवानी, रेणुकामाता रागावली आहे... सर्व सजीवसृष्टी निर्माण करणारी ती असीम-अनंत शक्ती...आज नाराज आहे माणसावर...हे समजून घ्या. तिने निर्माण केलेल्या कोट्यावधी जीवांपैकी एक जीव म्हणजे माणूस. आणि ह्या माणसाने आज ह्यापैकी लाखो जीवांचा नाश केलाय...मागच्या 200 वर्षात लाखो प्रजाती नष्ट केल्यात...आणि विकासाच्या नावाचे हे विनाशचक्र सध्या वर्षाला सुमारे एक लाख प्रजाती नष्ट करतेय. कोणती आई आपल्या लेकरांची हत्या सहन करेल? लक्षात ठेवा-अंबाबाई माफ तेंव्हाच करेल ज्यावेळी हा पृथ्वी भकास करणारा विकास माणूस थांबवेल. ही आई आता केवळ इशारा देऊन सोडून देत आहे. आतातरी जागे व्हा।*
*माणसातील राक्षस नष्ट करायला आणि त्याच्यातील देवत्व जागं करायला कोणीतरी जन्माला येतो असं आपण मानतो. भगवान श्रीकृष्ण सांगून गेले..."यदा यदा ही ..."*
*मित्रांनो, त्या अनंत शक्तीने आता रूप घेतलंय एका लहान मुलीचं ! ग्रेटा थनबर्ग तिचं नाव! स्वीडन देशाची. आठव्या वर्षी शाळेत व्हिडीओ बघितला अनेक प्रजाती नष्ट होताहेत याचा...खूप दुःखी झाली. छोटे मोठे उपाय करू लागली पण राज्यकर्ते-मीडिया-उद्योगपती कोणीच यासाठी काही करत नाही म्हणून निराशेच्या गर्तेत गेली 11 व्या वर्षी! आणि 15 व्या वर्षी ठाम निर्धाराने जाऊन बसली देशाच्या संसदेसमोर! असे काय केले तिने ज्यामुळे आज तिच्या नावाची चर्चा नोबेल पुरस्कारासाठी चालू आहे... वाचा आधी प्रसिद्ध केलेला लेख -*
*FFF : मुलांनी सुरू केलेली एक जागतिक लोकचळवळ*
*(FFF अर्थात फ्रायडे फॉर फ्युचर)*
*आधी उन्हाने भाजून काढलं. आता पावसाने रडवलं. अर्धा भारत पाण्याविना तडफडतोय; अर्धा पाण्यामुळे! युनो ने जाहीर केले आहे की दर आठवड्याला एक मोठी आपत्ती कोसळते आहे...पृथ्वीवर...ही आपत्तींची मालिकाच सुरू झाली आहे. कारण एकच: ग्लोबल वार्मिंग-पर्यावरण बदल! हे जगभर सिध्द झालेय. शास्त्रज्ञांनी उपाय करण्यासाठी फक्त पाच वर्षे हाती आहेत हा निर्वाणीचा इशारा दिला आहे. आता यावर उपाय एकच FFF !!*
*FFF ही ग्रेटा थनबर्ग नावाच्या एका 15 वर्षाच्या मुलीने सुरू केलेली पर्यावरण विषयक जनजागरण मोहीम आहे.*
https://www.fridaysforfuture.org/
Greta Thunberg
https://www.facebook.com/gretathunbergsweden/ 】
*पर्यावरण समस्येवर ठोस काहीच उपाय केले जात नाहीत यामुळे अस्वस्थ असलेली ग्रेटा स्वतः 20 ऑगस्ट 2018 पासून सलग 3 आठवडे एकटीच स्वीडन संसदेसमोर जाऊन बसली. खासदारांना निवेदने दिली. यानंतर दर शुक्रवारी तिने शाळाबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात केवळ 11 महिन्यात 131 देशांतील 20 लाखाहून अधिक मुले सहभागी झाली आहेत. हे सर्वजण यात उत्स्फूर्तपणे सामील झालेत.*
*या मोहिमेचा 11 महिन्यात हा परिणाम झाला आहे की,*
*★5 विकसित देशांनी 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर केली आहे.*
*★775 महानगरपालिकांनी आणि 7000 युनिव्हर्सिटी-कॉलेजनी 'पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर केली*
*★न्यूझीलंड ने GDPआधारित अर्थसंकल्प बंद केला. आता अर्थसंकल्प फक्त 'पर्यावरणपूरक मानवी कल्याण' यावर आधारित असेल.*
*सर्व एकत्र आलो-तरच बदल घडवू शकतो या विचाराने जगभर सर्व पर्यावरणप्रेमी संघटना, NGO, शास्त्रज्ञ, नागरीक आपले मतभेद सोडून FFF मोहिमेत सामील होत आहेत.याचे कोणीही स्थानिक नेतृत्व नाही. मोहिमेचा एकच जागतिक चेहरा-15 वर्षांची ग्रेटा थनबर्ग ! या मोहिमेमध्ये प्रत्येकजण उत्स्फूर्त लीडर आहे.सर्वजण एक झाल्यामुळेच सिस्टीम बदलाची सुरुवात झाली आहे. फक्त 3.5% लोक एकत्र आले की मोठा बदल घडून येतो हे जगभर सिद्ध झाले आहे.*
*कोल्हापुरात FFF जनजागरण मोहीम सुरू आहे."पर्यावरणबदल-समस्या आणि उपाय" याबाबत पूर्ण विस्ताराने ऑडिओ-व्हिज्युअल माहिती शाळा,कॉलेज,कंपनी,सोसायटी, सर्व संस्थांमध्ये आम्ही देत आहोत. आम्हाला यासाठी संपर्क करा.*
*FFF-Kolhapur Mission Statement*
*FFF ही मोहीम राबविताना आम्ही 2 कामांना प्राधान्य देत आहोत -*
*'पर्यावरण बदल' हा विषय सर्वांगाने जनतेला समजावून सांगून, त्याबद्दल जनजागरण करून,*
*1) प्रत्येक नागरिकाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची लोकचळवळ उभी करणे,*
*2) पर्यावरणपूरक विकास व पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मूलभूत सिस्टीम बदलाचा आग्रह धरणे*
FFF चे शाळाबंद आंदोलन दर शुक्रवारी जगभर चालू आहेच. आवश्यक बदल *प्रत्यक्षात घडून येईपर्यंत* ते चालूच राहणार आहे. त्यांचा मोठा *'डीप स्ट्राईक 20 सप्टेंबर'* रोजी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात त्यात 50000 लोक सामील व्हावेत अशी तयारी सुरू आहे. आपण त्याला हातभार लावू शकता.
*कोल्हापूरकरांनी FFF Kolhapur व्हाट्सएप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/K1HuTaKYi4W698qZIM8t7t
*इतरांसाठी FFF Maharashtra*
https://chat.whatsapp.com/CIW9TvIAHm0GcygwWAa40F
*याबाबतचे महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी टेलिग्राम लिंक*
FFF INDIA
Friday For Future
https://t.me/FFFINDIA
संपर्क:
दिनेश मुर्ढेकर 9922935521
संतोष कुशे 09922400332
नितीन डोईफोडे 9561933771
*Let us join hands ; Everyone is needed.*
*जगाच्या लोकसंख्येच्या 3.5 टक्क्यांहून अधिक लोक एकत्र आले (उदा.33कोटी) तर पूर्ण बदल घडू शकतो. मानवजात वाचू शकते. मित्रहो, आपल्या प्रत्येकात तोच देव आहे. केवळ 20 लाख मुले एकत्र आली तर एवढा बदल...33 कोटी एकत्र आले तर पूर्ण सिस्टीममध्ये बदल घडून येईल. सजीवसृष्टीला आता ह्या 33 कोटी देवांची गरज आहे. त्यापैकी तुम्ही एक असू शकता. तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार निसर्गाच्या की ...?*
*लक्षात ठेवा आई अंबाबाई परत परत माफ करणार नाही...तुमची शहरे, रोड-पूल-फ्लायओव्हर्स-इमारती-कारखाने-मेट्रो-शेती सर्व नष्ट करण्यासाठी तिला फारसा वेळ लागत नाही हे तिने वारंवार दाखवले आहे. माणसाएव्हढीच तिची इतर लेकरं तिला प्रिय आहेत. तिच्या इतर लेकरांच्या गळ्यावर सूरी फिरवणाऱ्यांना फक्त 5 वर्षे दिली आहेत तिने : चूक सुधारायला...*
*Join FFF !*
*Together we can correct it !!*
*Everyone is needed !!!*

Comments

Popular posts from this blog