*भारताने 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' का जाहीर करायला हवी?*
(वाचनकाल: 3.30 मिनिटे)
(वाचनकाल: 3.30 मिनिटे)
*1)शतकातून एखादवेळी होणारी ढगफुटी ह्या मान्सूनमध्ये भारतात शेकडो ठिकाणी झाली. लाखो लोक पूरग्रस्त व अब्जावधी रुपयांचे नुकसान! पुरामुळे सुपीक शेतातील मातीचा वरचा अनमोल थर वाहून जात आहे.*
*2) महाराष्ट्रात ह्या मौसमात सव्वा दोन कोटी एकरवरील पिके नष्ट झाली. देशभरातील आकडेवारी खूप मोठी निघेल. सरकारकडून जाहीर झालेली मदत एकरी 3 ते 6 हजार! ज्या एकरातील पिकामुळे घरी लाख, दोन लाख येणार होते व त्यामुळे वर्षभर घर चालणार होते त्यांच्या आयुष्याची होणारी फरफट डोळ्यांपुढे आणून बघा. देशभरात हेच चित्र आहे.*
*3) 2018 साली भारतात 485 ठिकाणी उष्मा लाटा आल्या, 2010 साली फक्त 21 ठिकाणी उष्मालाटा आल्या होत्या. त्या दरवर्षी वाढत आहेत. दोन शहरात तापमान 50℃ च्या पार गेले. उष्मालाटांमुळे दरवर्षी शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत.*
*4) भारतात आजमितीला जल-जमीन-वायुप्रदूषण चरमसीमेला पोहचले आहे. सरकारी रिपोर्टनुसार देशाची 30% सुपीक जमीन वाळवंटीकरणाकडे झुकली आहे. देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येणार आहे. कारण सागरी प्रजाती देखील वेगाने नष्ट होत आहेत. शेती व मासेमारीवर अवलंबून असलेल्या करोडो लोकांचा रोजगार व आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या सामाजिक असंतोषाच्या शक्यतांचे इशारे अभ्यासकांनी दिले आहेत.*
*5) ह्या वर्षी अर्ध्या देशात महापुर थैमान घालत असताना 60 कोटी लोक पाण्याविना तडफडत होते. देशात व प्रमुख 21 शहरात संभाव्य भीषण पाणीटंचाईचा निती आयोगाचा अहवाल आहे.*
*6) वायुप्रदूषणामुळे दर मिनिटाला भारतात एका बालकाचा मृत्यू होत आहे. ह्या वायूंचे नॅनोकण श्वसनाद्वारे फुफ्फुसात व तेथून रक्तात मिसळून प्रत्येक अवयवात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे डायबेटीस, हार्ट अटॅक, मिसकॅरेज ते अगदी कँसरपर्यंतचे सर्व आजार वाढले आहेत. ह्या सर्व आजारांमध्ये वायुप्रदूषणाचा मोठा सहभाग नुकताच सिद्ध झाला आहे.*
*7) दरवर्षी सैंड स्टॉर्म, वादळांमुळे शेकडो मृत्यू होत आहेत. फणी, वायू, क्यार या चक्रीवादळांतून सावरत असतानाच बुलबुल चक्रीवादळाने 23000 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे.*
*8) 2018 साली जमिनीवरील वादळे ,उष्मालाटा, अतिवृष्टी, ढगफुटी, अॅसिडरेन, महापूर, दिर्घदुष्काळ, भूस्खलन, वादळे, चक्रीवादळे,... या संकटांची मालिका भारतभर वाढली आहे. प्रत्येक संकट हजारो कोटी रुपयांचे नुकसान करून गेले आहे.*
*9) या सर्व संकटांमुळे झालेले एकत्रित नुकसान काही लाख कोटी रुपयांचे आहे. ज्यांनी परिवारातील व्यक्ती गमावला त्यांचे नुकसान मोजता येण्यापालिकडे आहे. ह्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारला करावा लागणारा खर्च हा देखील अवाढव्य आहे. अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण हा दरवर्षी वाढत जाणार आहे, कारण ही संकटे, त्यांची तीव्रता व त्यामुळे होणारे नुकसान हे दरवर्षी वाढतच जाणार आहे. देशभर करोडो संसार ह्या संकटांमुळे व वाढत्या आजारांमुळे उध्वस्त होत आहेत. देशाच्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात भूकंप घडवणाऱ्या, देशाच्या प्रत्येक नागरिकावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या, 'जागतिक तापमानवाढ व हवामानबदल' नावाच्या संकटावर मात करण्यासाठी, 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर करून युद्धपातळीवर उपाय करण्याची नितांत गरज आहे. याला पर्याय नाही.*
*पर्यावरणीय आणीबाणी* जाहीर केल्यावर,
*1)या समस्येचे अस्तित्व नाकारणे चालू आहे, ते बंद होईल.*
*"'जागतिक तापमानवाढ/हवामानबदल' हे घडतच नाही आहे", असा रेटून प्रचार करण्यासाठी काही कार्पोरेट कंपन्या दरवर्षी अब्जावधी रुपये खर्च करत आहेत. प्रदूषण वाढविणाऱ्या अनेक कार्पोरेट कंपन्यांच्या दबावामुळे अनेक देशातील सरकारे असा प्रॉब्लेम नाहीच आहे असे जाहीर करतात व तसे वागत आहेत. आणीबाणी जाहीर केल्याने ही समस्या आहे हे सत्ताधाऱ्यांकडून जाहीररीत्या स्वीकारले जाईल. या समस्येचे अस्तित्व नाकारणे चालू आहे, ते बंद होईल.*
*2) मोठ्या प्रमाणावर जागृती घडेल. टीव्ही, प्रिंट मीडिया व सोशल मीडियावर याबाबत प्रचंड प्रमाणात चर्चा सुरू होईल. हा मुद्दा मुख्य अजेंडा बनेल.*
*3) त्यामुळे युद्धपातळीवर उपाय करायला हवेत हा दबाव निर्माण होईल. हा दबाव गरजेचा आहे कारण, शास्त्रज्ञांनी 5 वर्षांत मोठे बदल नाही झाले तर पुढील 25 वर्षांत मानवजात नष्ट होईल, हा इशारा दिला आहे. 20000 शास्त्रज्ञांनी पत्रकाद्वारे 'पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर केली आहे*
*4) आणीबाणी जाहीर केलेल्या 40 शहरांच्या महापौरांच्या मीटिंग मध्ये हे ठरले की इथून पुढे प्रत्येक धोरण आखताना ते पर्यावरणपूरक आहे का हे काटेकोरपणे पहायचे.*
*5) परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मोठे कठोर व कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत. जनजागृती झाली तर कोणत्याही सरकारला कडक उपाययोजना राबवता येतील. उदाहरणार्थ प्लॅस्टिक बाबत पुरेशी जागृती झाल्यावर सरकारला त्यावर बंदी आणणे शक्य झाले. त्यामुळे जनजागृती करून आपण सरकारचे काम सोपे करत आहोत, व आपले जीवनपण वाचवत आहोत.*

*आता राजकारण, बॉलिवूड, क्रिकेट,.. हेच समाजातील प्रमुख विषय आहेत. जागतिक तापमानवाढ व हवामानबदल हा विषय सर्वात प्रमुख बनणे गरजेचे आहे. त्यासाठीच 'पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर होणे नितांत गरजेचे आहे.*
*उपाय व आराखडे हळूहळू बनतीलच, ते बनविण्याचा व अंमलात आणण्याचा प्रचंड दबाव निर्माण होईल. इतर देशात ते बनलेदेखील आहेत. ते घेता येतील.*
*कचरा वर्गीकरण, पब्लिक ट्रान्सपोर्ट,... अशा जास्त उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींवर तातडीचे उपाय होतील. जास्त उत्सर्जन करणाऱ्या कारखान्यांच्या बाबतीतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मानसिकता तयार होईल.*
.
.
.
*आज कल्पना न केलेले बरेच काही घडेल.*

*_चला, आपण एक झालो तर अशक्य काही नाही. जगातील मोठे बदल फक्त 3.5% लोक रस्त्यावर उतरल्यावर घडले आहेत. हजारो लहान मुले रस्त्यावर उतरून "आमचे भविष्य वाचवा", ही मागणी करत आहेत. आपण त्यांना मदत तरी करूया._*
- नितीन डोईफोडे 9561933771
*फ्रायडेज् फॉर फ्यूचर-कोल्हापूर*
(Like n share facebook page:
*FFF Kolhapur*
https://www.facebook.com/FFF-Kolhapur-101331081241282/
*फ्रायडेज् फॉर फ्यूचर-कोल्हापूर*
(Like n share facebook page:
*FFF Kolhapur*
https://www.facebook.com/FFF-Kolhapur-101331081241282/
अधिक माहितीसाठी वाचा:
*"रेड अलर्ट", "Now or Never"* व इतर लेख
https://nitindoiphode73.blogspot.com/?m=1)
*"रेड अलर्ट", "Now or Never"* व इतर लेख
https://nitindoiphode73.blogspot.com/?m=1)
Comments
Post a Comment