Posts

*ते नव्हं,* *आपला जागं व्हायचा मुहूर्त तरी कवा हाय म्हणायचा?* *'वणी'ला ढगफुटी...* *पुण्यात 13 जण जीवानिशी गेलं...* *आणि आकडा तासातासाला वाढतोच हाय...* *ऑगष्टमदी देशात 33 शहरात ढगफुटी...* *कोल्हापूरकरांनी महापूर तर आधीच बघितलाय...* *तिकडं काही भागात 35 दिवसात एकदा पाणी मिळतंय...* *दूर पलीकडे बहामात पाणी आणि अन्नासाठी आत्ताच खून पडलेत...* *तुम्ही झोपडीत रहात असा नाहीतर करोडोंच्या बंगल्यात... कोणच वाचणार नाय... समदी एकजात मरणार... कारण जिवाणूंचं कामच बिघडत चाललंय... ग्लोबल वॉर्मिंगमुळं ! खाल्यालं अन्न पचवायला पोटातल्या जिवाणूंचं आणि पिकांनी अन्न बनवायला जमिनीतल्या जिवाणूंचं काम खूप महत्त्वाचे हाये. तेच बिघडल्यावर मानवजात वाचणं अगदी अशक्य !* *शास्त्रज्ञच ह्ये सांगतायत...* *संकटांची मालिका सुरू झालीया सगळीकडं... महापूर, ढगफुटी, ऍसिड रेन, दीर्घ दुष्काळ, वादळे, चक्रीवादळे, गारपीटी, वणवे, उष्मा लाटा, साथीचे रोग,...* *एकामागोमाग एक...* *पण आम्ही अडकलेले EMI च्या चक्करमध्ये नाहीतर 'एक और...' च्या नशेमध्ये...* *मशीन झालंय आमचं...रोबोट जणू !* *ते 'संवेद
*हाताने रंगवलेल्या एका पोस्टरची क्रांती ; मानवजात वाचवण्याची एकमेव आशा* (पोस्ट वाचण्यास लागणारा वेळ: फक्त 3.5 मिनिटे) *प्रश्न 1)* *Why should I join Fridays For Future?* *मी 'फ्रायडेज् फॉर फ्यूचर'-मोहीमेत का सामील व्हावे?* उत्तर- कोल्हापूरला बसलेला महापुराचा तडाखा ही एक छोटी झलक आहे. *ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार "आपण दररोज 4 लाख अणुबॉम्बच्या स्फोटातून बाहेर पडेल इतकी उष्णता पृथ्वीच्या वातावरणात सोडत आहोत...दररोज !" यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. आपण 2013 पासून रेड झोन मध्ये प्रवेश केला आहे. निसर्गाचे संतुलन, कोसळण्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. येत्या 5 वर्षांत मोठे बदल नाही केले तर निसर्गात विनाशकारी घटनांची अशी मालिका सुरू होईल की मग सावरायलाही वेळ नसेल आणि तेव्हा उपाय करूनदेखील फायदा होणार नाही. पुढील 20 वर्षांत मानवजात नष्ट होऊ शकते, हा शास्त्रज्ञांचा इशारा आहे. याबद्दल जगभरातील सर्व सरकारे पुरेशा उपाययोजना करत नसल्याने जगभर शास्त्रज्ञ रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. सर्व शास्त्रज्ञ आपल्या सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन करत आ
*भारताने 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' का जाहीर करायला हवी?* (वाचनकाल: 3.30 मिनिटे) *1)शतकातून एखादवेळी होणारी ढगफुटी ह्या मान्सूनमध्ये भारतात शेकडो ठिकाणी झाली. लाखो लोक पूरग्रस्त व अब्जावधी रुपयांचे नुकसान! पुरामुळे सुपीक शेतातील मातीचा वरचा अनमोल थर वाहून जात आहे.* *2) महाराष्ट्रात ह्या मौसमात सव्वा दोन कोटी एकरवरील पिके नष्ट झाली. देशभरातील आकडेवारी खूप मोठी निघेल. सरकारकडून जाहीर झालेली मदत एकरी 3 ते 6 हजार! ज्या एकरातील पिकामुळे घरी लाख, दोन लाख येणार होते व त्यामुळे वर्षभर घर चालणार होते त्यांच्या आयुष्याची होणारी फरफट डोळ्यांपुढे आणून बघा. देशभरात हेच चित्र आहे.* *3) 2018 साली भारतात 485 ठिकाणी उष्मा लाटा आल्या, 2010 साली फक्त 21 ठिकाणी उष्मालाटा आल्या होत्या. त्या दरवर्षी वाढत आहेत. दोन शहरात तापमान 50℃ च्या पार गेले. उष्मालाटांमुळे दरवर्षी शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत.* *4) भारतात आजमितीला जल-जमीन-वायुप्रदूषण चरमसीमेला पोहचले आहे. सरकारी रिपोर्टनुसार देशाची 30% सुपीक जमीन वाळवंटीकरणाकडे झुकली आहे. देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येणार आहे. कारण सागरी प्रजाती
...नाहीतर आपला पण डायनासोर होईल कल्पना करा, चीन सारख्या मोठ्या देशाने भारतावर आक्रमण केले आहे, काय घडेल? आणीबाणी जाहीर होईल आणि धर्म, जात, पंथ, पक्षीय राजकारण, उच-नीच, श्रीमंत-गरीब, सर्व भेद विसरून 135 करोड भारत वासी एक होतील आणि पूर्ण देश सर्व ताकद एकवटून युद्धास सज्ज होईल, कारण आपल्याला कोणाचे गुलाम व्हायचे नाही. मित्रहो, अशा युध्दापेक्षा शेकडो पट मोठे संकट आज मानवजातीवर घिरट्या घालत आहे. भारतासहित सर्व राष्ट्रांनी 'पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर करून युद्धपातळीवर उपाय करायला हवेत, कारण सर्वशक्तिमान डायनोसॉर जसे पृथ्वीवरून अचानक नष्ट झाले, तसे मानवदेखील नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   जागतिक तापमानवाढ व हवामानबदल हे हाताबाहेर जाण्याच्या बेतात आहे. 5 नोव्हेंबर 2019 रोजी 153 देशांच्या 11258 शास्त्रज्ञांनी क्लायमेट इमर्जन्सी अर्थात आणीबाणी जाहीर केली आहे. मागील वर्षी 20 हजार शास्त्रज्ञांनी असाच इशारा देऊनदेखील जगभरातील सर्व सरकारे-उद्योगपती यांनी नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले. गेली 30 वर्षे ते हेच करत आले आहेत. खरी शास्त्रीय आकडेवारी जाहीर केली जात नसल्यामुळे व स्थिती
*कोल्हापूरचा महापूर, आई अंबा बाई, जोतिबा आणि 33 कोटी देव* *आधी उन्हाने भाजून काढलं. आता पावसाने रडवलं. अर्धा भारत पाण्याविना तडफडतोय; अर्धा पाण्यामुळे!* कोल्हापुरात सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा महापूर आला आहे. अशा वेळी *आई अंबा बाई तूच वाचव,आता धाव...* अशी आर्त विनवणी करणारे मेसेज व्हाट्सएपवर फिरत आहेत. *महापुरात आपले प्राण धोक्यात घालून शेकडो लोकांनी, अडकलेल्या हजारो लोकांचे प्राण वाचवले. तो जोतिबाच ह्या सोडविणाऱ्यांच्या रुपाने आला होता. त्यांचे ऋण न फेडता येणारे!* *आई अंबा बाई, आई भवानी, रेणुकामाता रागावली आहे... सर्व सजीवसृष्टी निर्माण करणारी ती असीम-अनंत शक्ती...आज नाराज आहे माणसावर...हे समजून घ्या. तिने निर्माण केलेल्या कोट्यावधी जीवांपैकी एक जीव म्हणजे माणूस. आणि ह्या माणसाने आज ह्यापैकी लाखो जीवांचा नाश केलाय...मागच्या 200 वर्षात लाखो प्रजाती नष्ट केल्यात...आणि विकासाच्या नावाचे हे विनाशचक्र सध्या वर्षाला सुमारे एक लाख प्रजाती नष्ट करतेय. कोणती आई आपल्या लेकरांची हत्या सहन करेल? लक्षात ठेवा- अंबा बाई माफ तेंव्हाच करेल ज्यावेळी हा पृथ्वी भकास करणारा विकास माणूस थांबवेल. ह
फ्रायडे फॉर फ्युचर (FFF)  जागतिक पर्यावरण बचाव अभियान २०-२८ सप्टेंबर २०१९ (पर्यावरण सप्ताह )                                                                                                                                                                             महोदय, आधी उन्हाने भाजून काढलं, आता पावसाने आणि महापुराने रडवलं. अर्धा भारत पाण्याविना तडफडतोय, तर अर्धा पाण्यामुळे. पूर असो की वणवा जगभर दर आठवड्याला एक मोठे संकट ही मालिका आता सुरू झाली आहे. याचं कारण एकच आहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे वाढलेलं वातावरणाचं  तापमान अर्थात  'ग्लोबल वार्मिंग' आणि यामुळे पर्यावरणाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये झालेला बदल.  हे आता जगभर सिध्द झालेय. शास्त्रज्ञांनी उपाय करण्यासाठी आपल्या हाती फक्त पाचच वर्षे आहेत हा  निर्वाणीचा इशारा दिला आहे.                                                                                                                                                                                   या पर्यावरण समस्येवर ठोस उपाय केले जावेत यासाठी लहान मुलांनी एक जाग
पर्यावरण विषयक घोषणा slogans ... निसतंच म्हणतो धरणीमाय, तिच्यासाठी करतो काय? जिथे पृथ्वीचा विचार नाही, तो आपला विकास नाही जिथे नद्यांचा विचार नाही, तो आपला विकास नाही जिथे डोंगरांचा विचार नाही, तो आपला विकास नाही जिथे पक्ष्यांचा विचार नाही, तो आपला विकास नाही जिथे प्राण्यांचा विचार नाही, तो आपला विकास नाही लढूया हक्कासाठी, मुलांच्या भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी सामील व्हा,सामील व्हा हिरवी पृथ्वी वाचवण्यासाठी सामील व्हा,सामील व्हा पेट्रोल कम्पन्या करताय काय, ग्लोबल वार्मिंग दुसरं काय या कंपन्या चं करायचे काय, खाली डोकं वर पाय साथ दो साथ दो , प्रदूषण को मात दो माणसा माणसा जागा हो पर्यावरणाचा धागा हो चिमणीताई म्हणते काय हिरवी पृथ्वी माझी पण हाय ( ससाभाऊ, माकडकाका, खारुताई, जिराफमामा) पृथ्वीची रक्षा, आपली सुरक्षा जपा थर ओझोनचा, नाश होईल पृथ्वीचा झाडे बोलती, पक्षी गाती, घेऊ आता बदल हाती. कावळा म्हणतो काव काव माणसा जरा झाडं लाव जंगल जंगल बोल रहा है, ग्लोबल वॉर्मिंग बढ रहा है. माझी माय म्हणते काय, अजून धूर नको ग बाय धरणी माय म